महाराष्ट्र बजेट 2020: महाराष्ट्रात आर्थिक मंदी वाढणार : निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 10:02 AM2020-03-07T10:02:40+5:302020-03-07T10:08:29+5:30

वॉर्ड बॉयला ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करायला पाठविल्यावर असच होणार, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

BJP leader Nilesh Rane criticizes Thackeray government over budget | महाराष्ट्र बजेट 2020: महाराष्ट्रात आर्थिक मंदी वाढणार : निलेश राणे

महाराष्ट्र बजेट 2020: महाराष्ट्रात आर्थिक मंदी वाढणार : निलेश राणे

Next

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवार सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तर यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला असून, ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प बघितल्यावर महराष्ट्रात आर्थिक मंदी वाढणार असल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जवळपास १३ कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या असून, त्यापैकी १० कोटी जनतेला ह्या अर्थसंकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. आजचा अर्थसंकल्प बघितल्यावर वाटतंय २०/२१ आर्थिक वर्षात महाराष्ट्रात आर्थिक मंदी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून निलेश राणेंनी आपल्या खास शैलीत समाचार सुद्धा घेतला. "वॉर्ड बॉयला ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करायला पाठविल्यावर असच होणार, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

Web Title: BJP leader Nilesh Rane criticizes Thackeray government over budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.