शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो...; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 10:58 IST

Nilesh Rane : शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा.

ठळक मुद्देराम मंदिराच्या उभारणीसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवरून यापूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केली होती टीका.शिवसेनेच्या कार्यालय उभारणीसाठी घेतल्या जात असलेल्या निधीवरून निलेस राणेंची टीका

अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. मकर संक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर आता शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे."राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची. पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो 'बाब्या' दुसऱ्याचा तो 'कारटा'," असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत यावर टीका केली आहे. वाडा शहर शाखा, शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदतनीधी असं त्या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. यापूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून राम मदिरांसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवर टीका केली होती. काय म्हटलं होतं शिवसेनेनं?राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले, बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. तसेच, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिर निर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. हे राम!, असंही शिवसेनेनं म्हटलं होतं.वर्गणीच्या नावाखाली प्रचारक देशातून चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक वर्गणीच्या कामासाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल. मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा भाजप त्याच वणव्यावर भाजलेल्या पोळ्या खात आहे. अर्थात आम्हाला त्याचे दुःख नाही. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी रामलल्लाच्या बँक खात्यात जमा केला. याकामी अयोध्येत रामलल्लाच्या नावे बँक खाते उघडले असून त्यात जगभरातील रामभक्त सढळ हस्ते मदत करीत आहेत. एव्हाना मंदिरासाठी लागणारा ३०० कोटींचा निधी प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमाही झाला असेल, असंही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाPoliticsराजकारणRam Mandirराम मंदिरShiv Senaशिवसेना