शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 12:40 IST

मंगळवारी शेतकरी आंदोलनानं हिंसक होत पोलिसांवरही केला होता हल्ला

ठळक मुद्देमंगळवारी शेतकरी आंदोलनानं हिंसक होत पोलिसांवरही केला होता हल्लाजीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या लाल किल्ल्यावरून उड्या, अनेकांना गंभीर दुखापत

दिल्लीतशेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. दिल्लीतील विविध ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्या. दरम्यान, देशाच्या राजधानीचा मानबिंदू असलेल्या लाल किल्लाही हिंसक आंदोलनामधून सुटला नाही. दरम्यान, लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी 'पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?' असा संतप्त सवाल केला आहे. "पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती. पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?," असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. काय आहे प्रकरण?दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकऱ्यांचा एक मोठा हिंसक जमाव लाल किल्ल्यावर चाल करून आला. या जमावाने लाल किल्ल्यातील महत्त्वाच्या जागा ताब्यात घेऊन तिथे धार्मिक तसेच इतर झेंडे फडकवले. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही आंदोलकांनी हल्ला केला. यातील एक व्हिडीओ आता व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्यावर आंदोलक जमाव पोलिसांवर हल्ला करताना दिसत होता. तसंच पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारताना दिसत होते.दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये दंग्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते. यापैकी अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. "अ‍ॅडिशनल (ईस्ट) डीसीपी मंजीत यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले. अन्यथा मोठा अपघात झाला असता. याशिवाय अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत," अशी माहिती दिल्ली पोलिसांचे सह-आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितलं.

टॅग्स :BJPभाजपाNilesh Raneनिलेश राणे Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीFortगडFarmerशेतकरीPoliceपोलिस