शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:54 IST

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राणेंनी विरोध दर्शवला आहे.

पुणे : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर येत असून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली आहे. मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे. पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, "आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही."  मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असताना राणे काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. "कोण आहे जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी त्यांना ओळखत नाही. कशाला तुम्ही त्याचं सतत नाव घेता? त्यांना विचारून या की घटनेच्या कोणत्या कलमानुसार मराठा आरक्षण दिलं जावं," असं राणेंनी म्हटलं आहे.

'कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावू नये'

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत करत असलेल्या मागणीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही जोरदार विरोध केला आहे. ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी जरांगे पाटलांवर निशाणा साधत मराठ्यांच्या ओबीसीकरणाला विरोध दर्शवत आहेत. भुजबळ यांच्या काही वक्तव्यांमध्ये वादही निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न करू नये,' असं ते म्हणाले.

'... तर प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा'

राज्यात काही दिवसांनी दंगल घडू शकते, अशी भीती नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. आंबेडकर यांच्या या विधानावरून नारायण राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "प्रकाश आंबेडकर असे बोलले असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांना त्यांना अटक केली पाहिजे. कारण अशी माहिती लपवणे हा देखील गुन्हा आहे. त्यांना अटक करून तपास केला पाहिजे," असं राणेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNarayan Raneनारायण राणे Maratha Reservationमराठा आरक्षण