शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:43 IST

 जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस फक्त कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहे, तर दुसरा पाय राहुल गांधी ओढतायत. जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. एकीकडे संजय राऊत घोषणा करतात की उद्धव ठाकरे 7 मार्चेला राम मंदिरात जाणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याचसोबत सत्तेत असलेला त्यांचा जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा म्हणतो की, उद्धव ठाकरे रामंदिरात जाणार असेल तर आम्ही सुद्धा बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणार आहे का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तर शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात २०१४ पासून महाविकास आघाडीची चर्चा सुरु असल्याचे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितेले. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवारांसोबत संपर्कात होतो हे संजय राऊत यांनी कबूल केलं आहे, त्यामुळे विश्वासघात कुणी केला असा प्रश्न ही यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. तर भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचले असल्याचे सुद्धा सोमय्या म्हणाले.