शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना - सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:02 IST

कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

सातारा - भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या(kirit somaiya)  यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, 'हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader kirit somaiya attacks on ncp leader hasan mushrif in karad)

'मुख्यमंत्री अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार'

सोमय्या म्हणाले, 'हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. एवढेच नाही, तर 2020 मध्ये कुठल्याही पारदर्शतेशिवाय हा  कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचीही चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiyya : हसन मुश्रिफांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड?

कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या नावाने पैसे उभारले गेल्याचा आरोप करत, या घोटाळ्यासंदर्भात आपण ईडीकडे कागदपत्रे  देऊन उद्या तक्रार करणार आहोत,' असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर कारखान्यातील ९८ टक्के शेअर्स हे एका बैनामी कंपनीचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली. हे शरद पवारांना जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. याच वेळी, आपण पुढच्या आठवड्या पुन्हा भेटणार आहोत आणि हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस