शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

चार दिवस, चार मोठे दौरे; किरीट सोमय्या कोणाकोणाचा 'कार्यक्रम' करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 19:35 IST

मुंबई पोलिसांनी कार्यालयात डांबल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप; भाजप नेते संतप्त

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या घोटाळ्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या चर्चेत आले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस बजावून कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी करत असल्याचे आदेश काढले आहेत. ही नोटीस किरीट सोमय्या यांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना स्थानबद्ध केले आहे.

मुंबई पोलिसांच्या कारवाईबद्दल किरीट सोमय्यांनी संताप व्यक्त केला. माझ्याच कार्यालयात मला ४ तास डांबून ठेवण्यात आलं. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना योग्य उत्तर देऊ, असं सोमय्या म्हणाले. जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली असली, तरी कोल्हापूरात जाणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.“नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर’’, चंद्रकांत पाटील यांचा संतप्त सवाल 

उद्या कोल्हापूर दौरा करणार असून अजिबात मागे हटणार नाही, असं सोमय्या म्हणाले. येणाऱ्या काही दिवसांतले काही कार्यक्रमदेखील त्यांनी सांगितले. उद्या (२० सप्टेंबर) कोल्हापूरला जाऊन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांची पाहणी करणार. त्यानंतर २३ सप्टेंबरला पारनेरमधल्या साखर कारखान्याची पाहणी करणार. २७ सप्टेंबरला अलिबागला जाऊन कोलाईमध्ये रश्मी ठाकरेंच्या बंगल्याची पाहणी करणार आणि ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पाहणी करणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली. 

भाजप नेत्यांची ठाकरे सरकारवर टीकाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

माजी खारदार किरीट सोमय्या यांच्या घराच्या बाहेर १०० पोलिसांनी गराडा घातला आहे. किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर. दहशतवादी उजळ माथ्याने फिरताहेत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, बॉम्बस्फोट करण्यासाठी, गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईमध्ये दहशतवादी काम करताहेत. त्यातले काही जण पकडले जाताहेत. काही जण पकडले जात नाहीयेत. आणि इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे काढत असताना त्यांना कोल्हापूरला येण्यास मनाई करण्यात आली आहे. तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून परत पाठवू, सर्किट हाऊसमध्ये डिटेन करू, असे सांगितले जात आहे. म्हणजे येथील लोकशाही संपलीय. जे बोलायचे ते बोलायचे नाही. कशाच्या आधारे तुम्ही त्यांना डिटेन करणार आहात. ही दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याHasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील