शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

'जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है?', गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 12:58 IST

'उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले.'

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून एमआयएम प्रमुख औवेसी भाजपचे अंगवस्त्र असल्याची टीका करण्यात आली आहे. त्यावर भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक प्रत्युत्त दिलं आहे. उद्धव सेनेचे 56 आमदार युतीच्या जीवावरच निवडून आले, हे जनाब संजय राऊत विसरले असतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

गोव्यात काँग्रेसला खिंडार? लवकरच माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले की, 'राज्यात उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले. कदाचित हे जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपचे अंगवस्त्र म्हणून केली, पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावात इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. अमरावती मनपातही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. जनाब संजय राऊत MIM की मुहब्बत कौन है? हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही', अशी टीका पडळकर यांनी केली.

भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नयेपडळकर पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर कारवाई करण्याची तुमच्यात हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. महाविकासआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता. महाराष्ट्रातील जनतेला या खेळाचा किळस आलाय', असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतGopichand Padalkarगोपीचंद पडळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी