शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांवर फडणवीसांचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 16:48 IST

दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

मुंबई: भाजपा सरकारचा कारभार पारदर्शकच होता. त्यामुळे आम्हाला चौकशांच्या धमक्या द्यायच्या नाहीत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आकसबुद्धीनं काम करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं आम्हाला त्याची चिंता वाटत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचं चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आम्ही पाच वर्ष अतिशय स्वच्छ कारभार केला आहे. त्यामुळे आम्हाला चौकशीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही त्या मान्य करत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'भाजपा सरकारचा, आमच्या मंत्र्यांचा कारभार जनतेनं पाहिला आहे. सध्याचं सरकार सूडबुद्धीनं कारभार करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं कोणतीही चिंता वाटत नाही,' अशा शब्दांत फडणवीसांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या ५ वर्षांतला भाजपा सरकारचा कारभार राज्यानं पाहिला आहे. त्यांच्या काळात अगदी राजरोजपणे भ्रष्टाचार सुरू होता. फडणवीस सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार होतं. त्यांच्या काळातली एक एक प्रकरणं आता आम्ही बाहेर काढू, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा