शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अतिशय अपरिपक्व', राज्यपालांना पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 17:36 IST

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं, त्याला मुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारेच प्रत्युत्तर देण्यात आलं.

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला काल मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलं. याच मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोचरी टीका केली आहे.

देशात लवकरच दिसतील 'फ्लाइंग कार', ज्योतिरादित्य शिंदेंनी सादर केले कारचे मॉडेल 

या प्रकाराला राजकीय रंग देणं योग्य नाहीमीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गेली 25 वर्षे झाली पाहतोय. सरकार कुणाचंही असो, राज्यपाल कुणाचेही असो, अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. पण, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर दिल्याचं कळालं. मुख्यमंत्री कार्यालयानं अपरिपक्वता दाखवली. मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेलं आहे. अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते, तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. या प्रकाराला अशाप्रकारे राजकीय रंग देणं योग्य नाही. हे तर अपरिपक्वतेचं परिचायक आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

यूपी ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात

राज्यपालांना आदेश देण्याचा, फॉरवर्ड करण्याचा अधिकारफडणवीस पुढे म्हणाले, एखाद्या पक्षाचं डेलिगेशन जेव्हा राज्यापालांना भेटतं, त्यावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र जातं. हे डेलिगेशन मला भेटलं, या त्यांच्या मागण्या आहेत, त्यानुसार आपण कारवाई करावी. असं राज्यापालांकडून सांगितलं जातं. आताही जे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलं त्यात सांगितलं की, मला 13 आमदारांचं डेलिगेशन भेटलं, त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा आणि यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. याचा आपण विचार करावा, असं त्या पत्रात होतं. राज्यपालांनी कुठलाही आदेश दिला नव्हता, असं फडणवीस म्हणाले.

संभलचा 'गाझींची भूमी' उल्लेख, ओवैसींच्या दौऱ्यापू्र्वी MIM चे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

नेमकं प्रकरण काय आहे ?मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं होतं. यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी त्या पत्रात करण्यात आली होती. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून पत्राद्वारेच उत्तर देण्यात आलं. राज्यपालांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती करुन संसदेचं चार दिवसीय विशेष सत्र बोलावाव, असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी