शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटवरुन गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का?; चित्रा वाघ यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 10:07 IST

महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक (Nawab Malik) यांना कोणी दिला?, चित्रा वाघ यांचा सवाल

ठळक मुद्देमहिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला, वाघ यांचा सवाल.

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून NCB च्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला.

"महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक हे एका महिलेची कौटुबीक विषयाबाबतची बदनामी करताना दिसत आहेत. ते काझी म्हणतायत की त्यांच्याजवळ असलेली कादगपत्रे खरी आहेत. त्याची शाहनिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते. परंतु अशा पद्धतीनं महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला," असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. "एका ट्वीटवरून गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्रीदेखील उघडपणे महिलेची होत असलेली वैयक्तिक बदनामी ऐकताना पाहतानादेखील गप्प कसे काय? यावरू एक गोष्ट सिद्ध होते, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा सत्तेवर येते तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्याय झालेला पाहायला मिळतो," असंही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते मौलाना?२००६ मध्ये मौलाना मोहम्मद अहमद यांनी समीर वानखेडेंचा निकाह केला होता. त्यांनी या प्रकरणावर भाष्य करत म्हटलंय की,  २००६ मध्ये लग्नादरम्यान समीर वानखेडे यांनी स्वत:ला मुस्लिम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर समीर वानखेडे यांचा शबाना यांचाशी निकाह झाला. निकाहच्या वेळी समीर आणि शबाना दोघे ही मुस्लिम धर्मीय होते. जर समीर वानखेडे मुस्लीम नसते तर मी निकाह करुन दिला नसता, असा दावा मौलाना अहमद यांनी केला होता.

संयमाचा बांध फुटतोय"नवाब मलिक हे घाणेरडं राजकारण करत आहेत, ते आमच्या वैयक्तिक बाबी, फोटो, कागदपत्रे सोशल मीडियावरुन जाहीर करत आहेत. आता, आमच्या संयमाचा बांध फुटत आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू," असा इशाराच क्रांती रेडकर यांनी दिलाय. तसेच, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बर्थ सर्टीफिकेटवरुन चॅलेंज दिले होते. जर, मी शेअर केलेला जन्मदाखला खोटा असेल, तर मी राजकारण सोडून देईन असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरही, रेडकर यांनी उत्तर दिलं, आता त्यांना ते सोडावं लागेल, असं रेडकर यांनी म्हटलंय.

टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरnawab malikनवाब मलिकChitra Waghचित्रा वाघ