शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

Sushma Andhare : "महाराष्ट्रातील अंधारयुग संपलंय, महिलांचे रक्षण करण्यास सरकार सक्षम;" भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 10:23 IST

माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक देतेय असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं होतं.

मला पोलिसांकडून काही इनपुट्स आले, बाहेर पडू नका. कुणी हल्ला करू शकतं. विद्यापीठात आंदोलन करताना पोलीस माझ्या बाजूला आले. तुम्ही सुरक्षित आहात का? अशी विचारणा झाली. पोलिसांकडे काही माहिती असल्याने ते अलर्टवर आहेत असं कळालं. माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो, अशी चिंता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली होती. यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“महिलेचे घर बुलडोझर लावून तोडणारे, महिलांवर खोटे गुन्हे घालून तुरुंगात डांबणारे सरकार गेले. महिलेला अर्वाच्य शिव्या घालणारा सत्ताधारी पक्षाचा नेता तुरुंगात आहे, त्यामुळे निश्चिंत राहा अंधारे बाई. महाराष्ट्रातील अंधारयुग संपलेले आहे. प्रत्येक महिलेचे रक्षण करण्यासाठी सरकार सक्षम आहे,”असं प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिलं आहे.

कायम्हणाल्याहोत्याअंधारे ?माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो. कमरेखालचे वार केले जाऊ शकतात त्यापलीकडे मला अडवण्यासाठी दुसरं काही केले जाऊ शकत नाही. मला चिंता आहे की, माझ्याकडे ५ वर्षाचं बाळ आहे. ते शिवसेनेला दत्तक देते. सगळे शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील. आम्ही करेंगे और मरेंगे याच भावनेने लढतोय अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. 

आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. माझ्या सोसायटीखाली २ कॉन्स्टेबल येऊन बसले. मला सुरक्षा द्यायचं म्हणतायेत. मी याबाबत उद्धव ठाकरेंना माहिती दिली. दिवसभर माझ्यावर तणाव होता. माणूस म्हणून भावनिक असतो. जे होईल ते होईल. बाळाची चिंता वाटली मग नंतर विचार केला त्याची जबाबदारी घ्यायला शिवसैनिक खंबीर आहेत असं त्यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे