शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'... म्हणजे माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय'; अतुल भातखळकरांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 00:10 IST

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंचा आरोप धादांत खोटा, भातखळकर यांचं वक्तव्य. २००९ मध्ये भातखळकरांनी मनसेकडून तिकिट मागितल्याचा राज ठाकरेंनी केला होता गौप्यस्फोट.

ठळक मुद्देराज ठाकरेंचा आरोप धादांत खोटा, भातखळकर यांचं वक्तव्य.भातखळकर यांचं वक्तव्य. २००९ मध्ये भातखळकरांनी मनसेकडून तिकिट मागितल्याचा राज ठाकरेंनी केला होता गौप्यस्फोट.

 MNS Raj Thackeray: भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला एका वेबिनारमध्ये बोलताना केला होता. मनसेच्या पक्ष बांधणीसाठी तितकेच चांगले नेते पक्षात हवे असतात, पण आजवर अनेक नेते मनसेला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेले याबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी विद्यमान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं याची माहिती दिली. यावर भातखळकर यांनी स्पष्टीकरण देत राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

"राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय," असं म्हणत भातखळकर यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. "गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करतोय," असं ते म्हणाले. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?"मनसेला नेते सोडून गेले असं अनेकदा सांगितलं जातं. पण जे सोडून गेले त्यांच्या फक्त एका बातमीशिवाय दुसरं काही झालं का? मला एक असं उदाहरण दाखवून द्यावं. माझ्याकडे बघून ते पक्षात आले आणि स्थानिक कारणांमुळे पक्ष सोडून गेले. आता पक्षांतराच्या गोष्टी होत असतात. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे नेते भाजपमध्ये गेले. त्यांचं काय झालं?", असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. "राज्याच्या २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे आले होते. त्यांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं. मी नितीन गडकरींना फोन करुन त्यांची समजूत काढली होती की असं करू नका. ज्या पक्षात आहात त्यातच काम करत राहिलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरNitin Gadkariनितीन गडकरी