शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 15:35 IST

PMC Bank Fraud : भाजपा नेत्यानं लगावला टोला

ठळक मुद्देPMC बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते रविंद्र वायकरांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं पत्र.चौकशीसाठी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती शुक्रवारी जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली. पीएमसी बँकेतील घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे."भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रविंद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता,  फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला...," असं म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून वायकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र शेअर करत निशाणा साधला आहे. काय आहे प्रकरण?पीएमसी घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली.ईडीच्या चौकशीत असे समोर आले की, राऊतने षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केला. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे / करार मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समोर आले.वर्षा राऊत यांना मंगळवारी चौकशीला बोलावले या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत २९ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत ईडीकडे वेळ मागितला. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावत ५ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPMC Bankपीएमसी बँकSanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरTwitterट्विटर