जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबांनी यांना वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या धक्क्यांला सामोरं जावं लागलं आहे. सेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला (आरआयएल) एकूण ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण २००७ मधील असून २०१० मध्ये सेबीनं रिलायन्स इंडस्ट्रीजला नोटीस बजावली होती. परंतु त्यावर आता कारवाई करण्यात आली. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. "रिलायंस पेट्रोलियममध्ये झालेल्या अफरातफरीप्रकरणी सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीला नोटीस २०१० मध्ये बजावली. पण कारवाई झाली नाही. कारवाई पुढे सरकण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर यावे लागले. हा काँग्रेसचा काळा इतिहास आहे," असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर टीका केली.
"रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास"
By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 13:53 IST
भाजपा नेत्याचा काँग्रेसवर निशाणा
रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास
ठळक मुद्देसेबीने मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावला ४० कोटी रुपयांचा दंड२००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडने शेअर बाजारात कथितरित्या गडबड केल्याचा आहे आरोप