शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 17:22 IST

Maratha Reservation Bill: हे आरक्षण निश्चितच टिकेल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.

Maratha Reservation Bill: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले होते. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, यावरून राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली असून, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे  फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मते मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे. 

चांगले होताना कुणी अपशकुन करू नये

विधिमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असे माझे मत नाही. पण एखादे चांगले होत असताना कुणी अपशकुन करू नये, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

दरम्यान, सभागृहात सर्व पक्षांनी एक मताने मराठा आरक्षण ठराव मंजूर केला. मला खात्री आहे ज्या पद्धतीने अभ्यास करून हे विधेयक मांडले गेले, हे विधेयक टिकेल अशी मला आशा वाटते. मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. मराठा समाजाने खूप लढा दिला आहे. मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. आंदोलकांची जी डोकी फोडली गेली, ते न करता शांततेने हा विषय सोडवता आला असता. टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार