शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजा मुंडेंची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 20:14 IST

pankaja munde on bjp : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपल्या पक्षावर नाराज आहेत अशा बातम्या मागील काळात मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. त्यानंतर मुंडेंनी राजकारणातून काही काळ ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले. पण, शिवपरिक्रमा यात्रेच्या माध्यमातून त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या अन् जनतेत मिसळल्या. मागील काही कालावधीतील राजकीय बाबींवर प्रकाश टाकताना मुंडेंनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. शिवपरिक्रमा यात्रेतून शिवशक्ती आणि जनशक्तीचे आशीर्वाद मिळाले असून यामुळे माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडेंची एक्स्लुझिव्ह मुलाखत लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी घेतली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, आधीच्या पिढीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना पाहिले आहे, पण ज्या पिढीने त्यांना पाहिले नाही ती मंडळी देखील आज माझ्यासोबत असल्याचे पाहून बाबांना अभिमान वाटत असेल. कारण त्यांना वाटत असेल की, माझ्या मुलीने माझी शक्ती अधिक वाढवली आहे. मुंडे साहेबांनी मला कधीच जातीवाद शिकवला नाही. मी आंतरजातीय विवाह झालेल्या घरात वाढली आहे. लोकांची मदत कशी करता येईल याबाबत मला शिकवण मिळाली आहे.  

पंकजा मुंडेंची 'मन की बात'गोपीनाथ मुंडेंनीभाजपासाठी खूप काही केले आहे, त्यांनी राज्यात सर्वत्र पक्ष वाढवला पण पक्षाने त्यांच्यासाठी पाहिजे तेवढ न करणं हे खटकत नाही का? असे विचारले असता त्या म्हणाल्या, "मुंडे साहेब वारले तेव्हा मला वाटले की ते कोणासाठीच मर्यादीत राहिले नाहीत. २०१४ च्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी त्यांचे नाव घेतले. तेव्हा चार उमेदवार उभे होते आणि विशेष म्हणजे चारही बॅनरवर साहेबांचे फोटो होते. आमच्या पक्षाचा एक पॅटर्न आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की आणखी काही करायला हवे. तसेच साहेबांचा सन्मान पक्षाने त्यांचा नेता म्हणून करावा माझे वडील म्हणून नाही."

...तर मी केंद्रात मंत्री झाले असते - पंकजा मुंडे"मागील काळात आम्ही काय गमावलं याबद्दल पक्ष चिंतन बैठक घेईल, हल्ली त्या बैठका कमी झाल्या असल्या तरी मार्ग काढला जाईल. पण, बाबांनी काय केलंय म्हणून मला काही नको किंबहुना मी त्यांची मुलगी आहे म्हणूनही मला काही नको. कारण तसं असतं तर मी बाबांच्या जाण्यानंतर केंद्रात मंत्री झाली असती. मात्र मीच केंद्रात जायला नकार दिला. बाबांच्या मृत्यूनंतर भाजपाकडे लोकांनी यावे यासाठी मी संघर्षयात्रा काढली. त्यामुळे माझ्या योगदानासाठीच पक्षाने मला द्यावे. बाबांनी दिलेल्या योगदानासाठी द्या असं मी म्हणणार नाही", असंही यावेळी त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडे