शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya : "आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हा पप्पू शब्दाचा अपमान"; किरीट सोमय्यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 19:48 IST

BJP Kirit Somaiya And Aaditya Thackeray : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणे हा पप्पू शब्दाचा अपमान करण्यासारखे आहे असा टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी (Aaditya Thackeray) टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. य़ानंतर आता भाजपाने देखील आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. 

भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी देखील आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणे हा पप्पू शब्दाचा अपमान करण्यासारखे आहे असा टोला लगावला आहे. "पप्पू म्हणणं योग्य नाही आणि आदित्य ठाकरे साहेबांना तर नाहीच नाही. कारण त्यांच्या इतकं हुशार... एका बाजुला पर्यावरणाचं प्ले कार्ड हातात घेऊन आरेत उभे राहिले. दापोलीला समुद्र किनाऱ्यावर त्यांचे संयोगी मंत्री अनिल परब यांचँ फाईव्ह स्टार 50 कोटींचं रिसॉर्ट बांधतात... त्या आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हा पप्पू शब्दाचा अपमान आहे" असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

अब्दुल सत्तार म्हणाले की, राजकारण वेगळं आहे. तुम्ही कॅबिनेट मंत्री, तुमचे वडील मुख्यमंत्री आणि २०२१ मध्ये हा प्रकल्प गुजरातला जातो. आपल्यावरील खापर दुसऱ्याच्या माथी मारायचं. हे सर्व पाप २०२१ मधील आहे. एकनाथ शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. लोकांमध्ये दिशाभूल निर्माण करायचं. संभ्रमाचं वातावरण बनवायचं असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे, अशा शब्दात सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. आता, आदित्य यांनीही सत्तारांना जशास तसे उत्तर दिलं आहे.   

मी त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, काल खातेवाटप वेगळं झालेलंय, उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलंय, कृषीमंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे माहिती नाही कारण बांधावर कोणी आलंच नाही. उद्योगमंत्री कोण हे उद्योजकांना माहिती नाही, हे दुर्दैव आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना