भाजपच्या मुलाखती ५ रोजी

By Admin | Updated: August 3, 2014 00:53 IST2014-08-03T00:53:04+5:302014-08-03T00:53:04+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी १५ आॅगस्टपूर्वी जाहीर करण्याची घोषणा भाजपने केली असून, त्यानुसार पक्षाने पूर्वतयारी सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांसाठी ५ आॅगस्टला

BJP interviews on 5 | भाजपच्या मुलाखती ५ रोजी

भाजपच्या मुलाखती ५ रोजी

विधानसभेचे पडघम : निरीक्षक येणार
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी १५ आॅगस्टपूर्वी जाहीर करण्याची घोषणा भाजपने केली असून, त्यानुसार पक्षाने पूर्वतयारी सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांसाठी ५ आॅगस्टला इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून पक्षातर्फे आमदार आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, हे दोन्ही निरीक्षक ५ आॅगस्टला नागपूरला येत आहेत.
रविभवनमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. दुपारी १२ ते ३ या दरम्यान ग्रामीणमधील सहा मतदारसंघांसाठी, त्यानंतर शहरातील सहा मतदारसंघांसाठी मुलाखती होतील, असे भाजपकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सर्वच मदतारसंघांत भाजपकडून उमेदवारी प्राप्त करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
त्यामुळे मुलाखतीला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP interviews on 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.