शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:14 IST

आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली. यामुळे ते पुढील आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीएत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणता चेहरा असेल, राहुल गांधी या काळात काय करतील, या साऱ्या राजकीय प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राहुल गांधी स्वत: निवडणूक लढवू शकले नाहीत. मला वाटते त्यांना निवडणूक लढविता येईल. कारण कोर्टातून निश्चितच त्यांना या निर्णयाला स्थगिती मिळेल. राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल होईल. याबद्दल काहीच शंका माझ्या मनात नाहीय, असे मत  पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. 

मुळात राहुल गांधींचे भाषण झाले कोलारमध्ये, गांधी राहतात दिल्लीमध्ये. किती कलमांचे उल्लंघन झाले आहे, हे पाहिले जाईल. सुरतच्या न्यायाधीशाला हा खटला चालविण्याचा अधिकार होता का? पूर्व चौकशी करायला हवी होती, ती केलेली नाही. अशा अनेक कायदेशीर बाबी आहेत त्याचा आम्ही वापर करू. काही क्षणांसाठी राहुल गांधी यांना आठ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही हे धरून चालू. परंतू राहुल गांधींचे दौरे, जाहीर सभा हे कोण थांबविणार आहे का? अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही. तसे आता काही नवीन कारस्थान सुरु झाले असेल तर माहिती नाही. त्यांचे नागरिकत्व रद्द करायचे, त्यांना देशाबाहेर घालवायचे असे काही घाटत असेल तर माहिती नाही, अशी शंका चव्हाण यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान पदाच्या उमेदवारावर बोलताना चव्हाण म्हणाले, १९७७ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण होता. जयप्रकाश नारायण यांनी उमेदवार न देता इंदिरा गांधींना पराभूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविली आणि जिंकली. आजही मोदींविरोधात तशीच निवडणूक लढवावी लागणार आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करू नये, सर्व पक्षांनी एकत्र यावे. राहुल यांच्या घटनेनंतर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. दिल्लीत आप, प. बंगालमध्ये तृणमूलसोबत. परंतू हे पक्ष एकत्र येतील. परंतू जे राहुल गांधी करू शकले नाहीत ते मोदींनी करून दाखविले याबद्दल त्यांचे धन्यवाद, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस