आत्मसमर्पण भावनेस भाजपाने ठेच पोहोचवली - नीलम गोऱ्हे

By Admin | Updated: October 6, 2014 04:34 IST2014-10-06T04:34:40+5:302014-10-06T04:34:40+5:30

एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली

BJP has hurt the surrendered feeling - Neelam Gorhe | आत्मसमर्पण भावनेस भाजपाने ठेच पोहोचवली - नीलम गोऱ्हे

आत्मसमर्पण भावनेस भाजपाने ठेच पोहोचवली - नीलम गोऱ्हे

नाशिक : एकदा साथ दिल्यानंतर ती, आत्मसमर्पण भावनेने देणे ही शिवसेनेची रीत आहे़ युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेत भाजपाने या भावनेस ठेच पोहोचवली, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केला़
सेनेने भाजपाला बिकट परिस्थितीत साथ दिली़ एकनाथ खडसेंबाबतही आम्ही कधी टीका केली नव्हती; परंतु तेच खडसे उद्धव ठाकरेंचा तोल गेला, अशी टीका करीत आहेत.युती कोणी तोडली हे सर्वज्ञात आहे़ या लढ्यात शिवसेना विरुद्ध सर्व असेच चित्र असून, सेनेला एकहाती सत्ता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगाव (सांगली) येथील सभेत बाळासाहेबांवर श्रद्धा आणि त्यांच्याप्रती आदर असल्याने शिवसेनेवर टीका करणार नाही, असे म्हटले आहे तरी भाजपाकडून टीका का होते, असे विचारले असता गोऱ्हे म्हणाल्या, पंतप्रधानांचे हे विचार नक्कीच योग्य व चांगले असून, ते भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये झिरपावेत.

Web Title: BJP has hurt the surrendered feeling - Neelam Gorhe