भाजपा उमेदवाराच्या पतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा "हात"

By Admin | Updated: April 18, 2017 14:49 IST2017-04-18T14:49:49+5:302017-04-18T14:49:49+5:30

लातूर मनपा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 16 च्या भाजपा उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद यांना बेदम मारहाण करण्यात आली.

BJP hands over Congress candidate's hand | भाजपा उमेदवाराच्या पतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा "हात"

भाजपा उमेदवाराच्या पतीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा "हात"

>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 18 - लातूर महापालिका निवडणूक आता मुद्यांवरुन गुद्यांवर आल्याचे दिसत आहे. कारण बुधवारी होणा-या मतदानाची तयारी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 16 च्या भाजपा उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद मालू यांना प्रभागातच बेदम मारहाण करण्यात आली. भाजपा नेत्यांनी या मारहाणीला काँग्रेस कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवले आहे. 
 
लातूर मनपासाठी बुधवारी मतदान होत आहे. सोमवारी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मात्र तरीही मंगळवारी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जनसंपर्कासाठी फिरत आहेत. मंगळवारी प्रभाग क्रमांक 16 चे भाजपा उमेदवार शितल मालू यांचे पती विनोद हे फिरत असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. 
 
विनोद यांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या विनोद मालू यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाहोटी यांनी काँग्रेसच्या उमेदवार विद्या पाटील यांचा भाऊ सुंदर पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. यामुळे परिसरातील काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांचा तणाव वाढला आहे.  
 

Web Title: BJP hands over Congress candidate's hand