शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील”; गोपीचंद पडळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 16:53 IST

Maharashtra Politics: मतांसाठी घाणेरडे राजकारण करणे ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Maharashtra Politics: समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानांमुळे भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला असून, जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. यातच कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील, अशी टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना आव्हाडांवर पलटवार केला आहे. 

कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून बोलत असतील

जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळे बोलत असतील. असे मला वाटते आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मतांच्या राजकारणासाठी घाणेरडे विधान करणे, घाणेरडे राजकारण करणे ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावे, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केले जात आहे, हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेले आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. 

दरम्यान, मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ, असे जितेंद्र आव्हाड यांनी ठामपणे सांगितले. तसेच बहुजन इतिहास डोळ्यात का सलतो? असा थेट विचारणा आव्हाडांनी केली असून ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड