भाजपने कधी शिवजयंती साजरी केली का ? - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: October 1, 2014 20:28 IST2014-10-01T20:25:31+5:302014-10-01T20:28:55+5:30
शिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथ असे म्हणणा-या भाजपने कधी शिवजयंती तरी साजरी केली का असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे.

भाजपने कधी शिवजयंती साजरी केली का ? - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १ - शिवछत्रपतींचा आशिर्वाद, चला देऊ मोदींना साथ असे म्हणणा-या भाजपने कधी शिवजयंती तरी साजरी केली का असा खोचक सवाल करत तुम्ही शिवछत्रपतींसमोर वाकणार नसाल तर आम्ही दिल्लीसमोर वाकणार नाही असे प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
परभणी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी प्रचार सभा घेत विरोधकांवर टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा भाजपवरच जास्त टीका केली. 'गरज सरो वैद्य मरो' या उक्तीप्रमाणे भाजपने केंद्रात सत्ता येताच शिवसेनेसोबतची २५ वर्ष जुनी तोडली. शिवसेना- भाजप युती ही जागावाटपाच्या नव्हे तर हिंदूत्वाच्या मुद्द्यावर झाली होती अशी आठवणही त्यांनी करुन दिली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे युतीतील धागा निखळला असून भाजपच्या विद्यमान नेत्यांनी बुद्धीबळाचा खेळ मांडला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.