शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

NCP vs BJP: बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 17:04 IST

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित!

NCP vs BJP: भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत मोठं विधान केलं. "राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं", असे बावनकुळे म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु असे वक्तव्य करणाऱ्या बावनकुळेंच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी समाचार घेतला. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करु आणि त्यांचा पराभव करु असे स्वप्न भाजपाचे लोक बघत असून त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे थेट प्रत्युत्तर त्यांनी दिले.

बावनकुळे सध्या 'मिशन बारामती'च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या दृष्टीने पक्ष बळकटीकरणासाठी कामाला लागला असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना तपासे म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघ राजकारणाने नव्हे तर समाजकारणाने बांधलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा परिचय राजकारणीपेक्षा एक समाजकारणी म्हणून जास्त आहे. राजकारण करण्याची भूमिका भाजपची तर समाजकारणाचे बाळकडू खासदार सुप्रिया सुळे यांना लहानपणापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या प्रेरणेतून मिळाले आहे."

"चंद्रशेखर बावनकुळे हे नव्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याने कार्यकर्त्यांसमोर बोलावं लागतं शिवाय. मिडियासमोर बोललं तर बातमी होते परंतु संपूर्ण महाराष्ट्राला खासदार सुप्रिया सुळे यांचे काम कसे आहे याचा परिचय आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामाची प्रशंसा करणारे अनेक भाजपा खासदार आहेत. शिवाय सलग सात वेळा संसदरत्न, १६ व्या लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद महारत्न आणि १७ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद विशिष्ट रत्न या पुरस्काराने खासदार सुप्रिया सुळे यांचा सन्मान करण्यात आला आहे आणि तेही मोदी राजवटीत करण्यात आलाय", अशी आठवण करून देत महेश तपासे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती