भाजपाला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही - सोनिया गांधी
By Admin | Updated: October 12, 2014 00:33 IST2014-10-11T18:43:40+5:302014-10-12T00:33:12+5:30
सर्वसामान्यांना अच्छे दिनांचे आमिष दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपाला जनतेची बिलकूल फिकीर नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला

भाजपाला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही - सोनिया गांधी
ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. ११ -सर्वसामान्यांना अच्छे दिनांचे आमिष दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपाला जनतेची बिलकूल फिकीर नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. गोंदियातील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
भाजपाच्या योजना या गरिबांसाठी नसल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांसाठी ज्या योजना तयार करण्यात आल्या त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मोदींच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
जन-धन योजनेद्वारे गरिबांचे भलं केल्याचा दावा मोदी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत, मात्र ही योजना मुळात काँग्रेसचीच असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने गरीबांपर्यंत बँकिंगची सुविधा पोहोचवली असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसने नेहमीच गरीब व कमकुवत लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाची गती कायम राखायची की नाही याचा निर्णय जनतेच्या हातात असल्याचे त्या म्हणाल्या.