शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेनंतर कल्याणात भाजप उतरली रस्त्यावर; पाहा भाजपनं काय दिला सेनेला इशारा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:03 IST

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून  रस्त्यावरच ठिय्या मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटलेले पाहायला मिळाले. कल्याणात शिवसैनिकांनी भाजप शहर शाखेवर दगडफेक करत भाजपा पदाधिका-याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेनंतर आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून  रस्त्यावरच ठिय्या मांडला.  भाजपाच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध करत यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर  देणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी दिवसात सेना भाजपमधील वाद विकोपाला पोहचण्याची दाट शक्यता आहे. कोरोना काळात  दोन राजकीय पक्षांच्या भांडणामध्ये एकीकडे कोंबड्याचा छळ झाला असून दुसरीकडे सामान्य नागरिकांनीही  याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

दगडफेक आणि मारहाणी प्रकरणी कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच  शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा छेडले जाईल असा इशारा सुद्धा  भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. यापुढे सेनेला जशाच तसे उत्तर दिले जाईल  सेनेमध्ये खरी हिंमत होती  तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहिजे होता असेही म्हात्रे म्हणाले. सेना भाजपमधील हा वाद पोलिसांसाठी  मात्र डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेCrime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा