शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: "राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 21:24 IST

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीत जो असंतोष आहे त्याला वाट मिळाली पाहिजे म्हणून भाजपानं पाचवा उमेदवार उभा केला. हा असंतोष आमच्या पाचव्या उमेदवाराला विजयी करेल. निवडणूक सोप्पी नाही परंतु संभव आहे असंभव नाही. चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. आमच्याकडेही असंतोषाबाबत माहिती आहे. त्यामुळेच आमचा पाचवा उमेदवार जिंकू शकतो असा विश्वास भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, कुठलाही पक्ष आपला उमेदवार जिंकावा यासाठी प्रयत्न करते. राजकारणात कुणीही दुसऱ्याचा उमेदवार जिंकवण्यासाठी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार धोक्यात टाकू शकत नाही. भाजपाने पाचवा उमेदवार उभा केला आहे तर गणिताच्या आधारे केला आहे हे महाविकास आघाडीला माहिती आहे. त्यामुळे कुणाला याचा फटका बसणार याच्या नादात ते एकमेकांचे आमदार फोडत आहेत. नाना पटोले गंमतीदार बोलतात. ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं.  असा टोला त्यांनी लगावला. 

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना फडणवीसांनी सांगितले की, १० तारखेला राज्यसभेच्या निकालात महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आहे. परंतु आता भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून आल्यानंतर विधान परिषद निकालानंतर तो कोसळेल. तुम्ही सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपली रणनीती यशस्वी होईल असा दावा आमदारांशी बोलताना केला आहे. 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवसेनेने सचिन आहिर, आमश्या पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. नुकत्याच राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेतही त्याची पुनरावृत्ती होईल का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी