शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

Maharashtra Political Crisis: “कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा अशी टीका करायची”; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 15:04 IST

Maharashtra Political Crisis: पंतप्रधान मोदींच्या कामाचा अवाका एवढा मोठा झालाय की, विरोधकांकडे त्याचे कोणतेच उत्तर नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. 

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहीत होते म्हणून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत त्यांना अटक केली, असा आरोप शरद पवारांनी केला होता. यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य आणि देशपातळीवर सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्र सोडण्यात येत आहे. याबाबत मीडियाशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. 

कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही

आजकाल ही फॅशन झालीये की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामं त्यांनी केली आहेत, की त्याचं कोणतेही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही. विरोधकांना एवढाच सल्ला देईन की, मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचे ते दर्शन घेतात. लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या गणपतींचे दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी, अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचेही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचे वेगळे नाते आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना दिली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी