शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही, पण शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 20:22 IST

आताचे सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते, असा टोला लगावण्यात आला आहे.

मुंबई:महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजप सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका केली. कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही. पण, शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी घणाघात केला. 

भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. आताचे सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते

गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते. ओबीसींना आवाज आणि नेता मुंडे यांनी दिला. पंतप्रधान मोदींनी नेहमी गरिबांचा विचार केला. हे नवीन सरकार नुसते घोषणा करते. गोपाळ शेट्टी यांनी सरकारविरोधात लढा चालू केला, तो आपण जिंकू. आताचे सरकार नवीन काही करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते. त्यांना एक रेघही पुढे ओढता येत नाही. ते जमत नसेल तर आम्ही सुरु केलेली कामे थांबवू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा

परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या. अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरू आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षाही रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरू आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही. याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी