शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपचीच मागणी"; जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रकरण सुरु झालं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:58 IST

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुडेंबाबत मोठा दावा केला आहे.

Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तसेच आता मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही धनंजय मुंडेंबाबत बोलताना मोठा दावा केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी  करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपचीच मागणी असल्याचे म्हटलं आहे.

"जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर येतोय तेव्हा त्यांनी त्यांना राजीनाम्यासंदर्भात समजवलं. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, त्यांनी आधी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. यात मुख्यमंत्र्यांनी आधीच निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट होत आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ही भाजपची सुद्धा मागणी असल्याचे आव्हाड म्हणाले. "धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही सगळ्यांचीच मागणी आहे. कारण ज्यातून हे प्रकरण सुरु झालं ते खंडणीचे प्रकरण होतं. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा ही भाजपची मागणी आहे. या मागणीसाठी भाजपला आमचे समर्थन आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'कृष्णा आंधळेची हत्या झालीये'

दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची हत्या झाल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला. कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण