शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:32 IST

BJP DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरबाबत भाजपा नेत्यांनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे.

BJP DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, असा अनेकांचा कयास आहे. आता काही दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत मेळावे, बैठका, सभा घेत आहेत. एका मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येण्याची खुली ऑफर दिली होती. यावर भाजपा नेत्यांनी पलटवार केला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना जोरदार प्रत्युत्तर दिले.

काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे. 

स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत

मला वाटते की, स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणे म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो असे सांगण्यासारखे आहे. नितीन गडकरी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचे नाव नव्हते. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचे नाव येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, भाजपाने अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करत ठाकरे गट तसेच संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठामध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी यांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता  करू नये, असा खोचक टोला भाजपाने लगावला.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे