शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन; उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा, पडद्यामागे काय घडते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:23 IST

BJP DCM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असून, अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा एनडीए पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चितपट केले. भाजपाला तर दोन आकडी संख्याही गाठता आले नाही. भाजपाच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. यातच या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजपा नेते अमित शाहदेवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

भाजपाचा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुंबईतील मुख्य पक्ष कार्यालयात भाजपाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी काही आकडेवारी मांडत पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी गर्दी केली आणि आपला हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. सागर बंगल्याबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी करत देवेंद्र फडणवीस यांना विनवणी केली.

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, ते ऐकून त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या.  सविस्तर माहिती घेतली. या मुद्यावर दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असे अमित शाह यांनी म्हटल्याचे सूत्रांकरवी समजते. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे लक्ष असेल. 

दरम्यान, भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत जात आहेत. दिल्ली भेटीत देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना, नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत काय होते, पदावरून मुक्त करण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य होते का,  नेते त्यांना काय मार्गदर्शन करतात, पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल