भाजपा नगरसेवकाला लाच घेताना अटक

By Admin | Updated: October 5, 2016 05:22 IST2016-10-05T05:22:23+5:302016-10-05T05:22:23+5:30

घरदुरुस्तीच्या वेळी केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४४ नेतीवली टेकडी येथील भाजपा

BJP corporator arrested for taking bribe | भाजपा नगरसेवकाला लाच घेताना अटक

भाजपा नगरसेवकाला लाच घेताना अटक

कल्याण : घरदुरुस्तीच्या वेळी केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक ४४ नेतीवली टेकडी येथील भाजपा नगरसेवक गणेश तुकाराम भाने याच्यासह त्याच्या एका साथीदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याणमध्ये मुद्देमालासह अटक केली.
भाने याच्या प्रभागातील एका महिलेच्या घराची काही दिवसांपूर्वी पडझड झाली होती. तिने घरदुरुस्तीचे काम कंत्राटदार खान यांना दिले होते. पण दुरुस्ती करताना केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी भाने याने कंत्राटदाराकडे १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार मंगळवारी सकाळी तिसगाव नाक्याजवळ गाडीत १ लाख रुपये घेताना भाने याच्यासह त्याचा साथीदार श्रीकांत नागरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले. या प्रकरणी स्थानिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. भाजपा नगरसेवकाला लाच घेताना पकडल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP corporator arrested for taking bribe