जुगार खेळणारा भाजपा नगरसेवक फरार
By Admin | Updated: August 20, 2016 10:30 IST2016-08-20T10:30:25+5:302016-08-20T10:30:25+5:30
जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून 12 जणांना अटक केली आहे, भाजपा नगरसेवक प्रशांत नारायण केळुस्कर घटनास्थळावरुन पसार झाला आहे

जुगार खेळणारा भाजपा नगरसेवक फरार
>- ऑनलाइन लोकमत
मिरारोड, दि. 20 - जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून 12 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे जुगार खेळणा-यांमध्ये भाजपाचा नगरसेवकही सामील होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर भाजपा नगरसेवक प्रशांत नारायण केळुस्कर घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेज 6 च्या मयूरा पेलेस इमारतीच्या एका सदनिकेत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक केली. मात्र भाजपा नगरसेवक प्रशांत नारायण केळुस्कर पसार झाला. पोलिसांनी 28 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या फिर्यादित केळुस्कर 11 व्या क्रमांकचा आरोपी आहे. याप्रकरणी भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.