भाजपाने केला राज्याचा अवमान

By Admin | Updated: October 5, 2014 01:58 IST2014-10-05T01:58:57+5:302014-10-05T01:58:57+5:30

भाजपाने राज्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सातारा जिल्ह्यातील प्रचारसभांमध्ये केली.

BJP contempt of state | भाजपाने केला राज्याचा अवमान

भाजपाने केला राज्याचा अवमान

>मल्हारपेठ / वाई (जि़ सातारा) : निवडणुकीच्या काळात भाजपाकडून प्रक्षेपित करण्यात येणा:या जाहिराती महाराष्ट्राचा अपमान करणा:या आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र तसा नसतानाही तो उद्ध्वस्त झाल्याचे भासविण्यात येत असून, भाजपाने राज्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सातारा जिल्ह्यातील प्रचारसभांमध्ये केली.
शरद पवार यांची शनिवारी वाई आणि मल्हारपेठ येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या जाहिरातींच्या अनुषंगाने मोदी सरकारवर प्रहार केला. 
पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपाच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश त्याचबरोबर अन्य राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये ते दिसून आले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला. परिणामी त्याचा फायदा देशातील 67 टक्के जनतेला झाला, मात्र मोदी सरकार देशातील संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त  करण्याचे काम करत असल्याचा आरोपही पवार यांनी केला़ (प्रतिनिधी)
 
‘महाराष्ट्र जणू काही रसातळालाच गेला आहे. अशी वातावरण निर्मिती भाजपाच्या जाहिरातीतून केली जात आहे. यामुळे राज्याची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार तीन महिन्यांत घेतलेल्या निर्णयामुळे लोकप्रियता हरवून बसले आहे. 

Web Title: BJP contempt of state