मुंबईत 18 जागांवर भाजपाचा दावा!
By Admin | Updated: August 7, 2014 01:51 IST2014-08-07T01:51:32+5:302014-08-07T01:51:32+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 18 जागांसाठी भाजपाने आग्रह धरला आहे.

मुंबईत 18 जागांवर भाजपाचा दावा!
>गौरीशंकर घाळे - मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 18 जागांसाठी भाजपाने आग्रह धरला आहे. ज्याचा खासदार त्याचे 4 आणि सहकारी पक्षाचे 2 उमेदवार असा 4-2 चा नवा फॉम्यरुला शिवसेनेच्या गळी उतरविण्याचा भाजपा नेत्यांचा प्रय} सुरु आहे.
मागील विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात मुंबई भाजपाच्या वाटय़ाला 13 जागा आल्या होत्या. यंदा मात्र भाजपाला त्यात वाढ हवी आहे. त्यासाठी 4-2 चा फॉम्यरुला पक्षाने मांडला आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनचा खासदार असेल तिथे 4 उमेदवार शिवसेनेचे व उर्वरित 2 घटकपक्षांकडे देण्यात यावेत. तर, भाजपा खासदार असेल तिथे 4 उमेदवार भाजपाचे व उर्वरीत 2 घटकपक्षांचे असा फॉम्यरुला मांडण्यात आला आहे. मुंबईतील सहा खासदारांपैकी सध्या शिवसेना व भाजपाचे प्रत्येकी 3 खासदार आहेत. या फॉम्यरुला मान्य झाल्यास दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 18 जागा येतात. या नव्या फॉम्यरुल्यामुळे भाजपाच्या खात्यात मागील निवडणुकीपेक्षा 5 जादा जागा येऊ शकतात. त्यानंतर महायुतीतील घटकपक्षांबाबत निर्णय घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट अद्याप कायम आहे. त्याचा महायुतीला फायदा होणार आहे. जागावाटपात ही बाब लक्षात घेण्याचा आग्रह भाजपा धरणार आहे. 4-2 च्या फॉम्यरुल्यासोबतच कायम पराभूत होना-या जागा, स्थानिक उमेदवाराची निवडणूक येण्याच्या क्षमतेचा विचार व्हावा, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. ज्या मतदारसंघात शिवसेना अथवा भाजपाचे उमेदवार कायम पराभूत होत आले त्या जागांची अदलाबदल व्हावी. तसेच एखाद्या मतदारसंघात दुस-या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा असेल तर त्याचा विचार व्हावा, असे भाजपा नेत्यांचे म्हणणो आहे.
महायुतीतील जागावाटपाबाबत
अद्याप अधिकृत बोलणी सुरु झाली नाहीत. महायुतीत नव्याने दाखल झालेल्या
पक्षांनाही जागावाटपात सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशामुळे भाजपा नेत्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे किमान काही जागा तरी वाढवून मिळाव्यात, असा आग्रह भाजपा नेत्यांनी धरला आहे.