शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:04 IST

BJP Chitra Wagh slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना मोठी खंत व्यक्त केली. ज्या पद्धतीने राजकीय कुरघोड्या, पक्ष फोडाफोड्या सुरू आहेत, ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि वारसा नाही. इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री तातडीने दिल्लीवारी करतात, दिल्लीत मुजरा मारायला जातात. इर्शाळवाडीत एकीकडे मृतदेह बाजुला काढायचे काम सुरू असताना हे दिल्लीत जाऊन काय करतात, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 

"पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत... सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र...दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" असा रोखठोक सवाल विचारला आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच ट्विट केलं आहे. "उद्धवजी तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे,  हे आम्ही जाणतो... पण त्याची झलक कुठं दिसली नाही राव. पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती.  आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत... सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते.  सारं केविलवाणं चित्र... दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…!पण काही प्रश्नांची उत्तरं घ्यायची राहिली बघा...."

"एखाद्या कणा असलेल्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर पोकळ बातांपेक्षा काही ठोस प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळाली असती... - कोविड घोटाळ्यात कंत्राटं कोणी ओरबडली?- कोविड घोटाळ्यात खैरातीसारखी कंत्राटं कुणाला वाटली?- पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं?- अलिबागचे 19 बंगले कुणाचे होते? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत, उद्धव जी ... यावर कधी बोलाल?" असा सवाल चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा