शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:47 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पाठीत वार केल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. "फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची हालत अशी विचित्र झालीय की सहनही होत नाही. मी पुन्हा येईन असे बोललो होतो. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय" असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असं सांगत, नाही नाही नाही... एकवेळ लग्न करणार नाही... या भाषणाची क्लिप दाखवली. यानंतर फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कलंक तुमच्या माथी… राज ठाकरेंना बाजूला करून स्वतःचच घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी…असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच तुमच्यावरील कलंकाची ही यादी संपणारी नाही. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा झाला नाही तो राज्याच्या जनतेचा कसा होणार? असा सवाल देखील केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"उद्धव जी… बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा कलंक तुमच्या माथी…हिंदुहदयसम्राटचे जनाब बाळासाहेब केल्याचा कलंक तुमच्या माथी…देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कलंक तुमच्या माथी…राज ठाकरेंना बाजूला करून स्वतःचच घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी…पुत्रमोहात अडकून मंत्रीपदी बसवल्याचा कलंक तुमच्या माथी…हनुमान चालिसाला विरोध करण्याचा कलंक तुमच्या माथी…कोविड काळात कंत्राट घेतल्याचा कलंकही तुमच्या माथी…तुमच्यावरील कलंकाची ही यादी संपणारी नाही. अरे, जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा झाला नाही तो राज्याच्या जनतेचा कसा होणार? हे कलंक घेऊन लोकांच्या दारी गेलात तर कोणी उभंही करणार नाही तुम्हाला…" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"देवेंद्रजींनी तुम्हाला लोळवलंय, आसमान दाखवलंय"

"उद्धवस्थ ठाकरेजी... सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी आमचे नेते देवेंद्रजीं वर टीका करावी एवढीही तुमची लायकी नाही. तुमची चिडचिड, मळमळ, गरळ… ही अवस्था मी समजू शकते. देवेंद्रजींनी तुम्हाला लोळवलंय, आसमान दाखवलंय. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजी काय आहेत हे जाहीरपणे सांगितलं आहे. देवेंद्रजी या राज्याची शान आहेत. आमचा मान-सन्मान आहेत" असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा