शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:20 IST

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली आहे. आता नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत आरजेडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये भाजपाचा गेम झाल्याचे दिसत आहे. एवढ्या घडामोडी घडत असताना भाजपा त्यापासून अनभिज्ञ कसा काय राहिला. बिहारमधील घडामोडींकडे भाजपानं दुर्लक्ष केलं की कुठलाच पर्याय नसल्याने जे घडतंय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपावर आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

राजकारणातला उद्धव मार्ग असं म्हणत डिवचलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात" असं म्हटलं आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी राजकीय चर्चांचे केंद्र बनल्या होत्या. भाजपाने आपलं सगळं लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरावर केंद्रित केलं होतं. त्यातूनच भाजपाने एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला बळ दिलं.

जेव्हा भाजपा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात गुंतला होता तेव्हाच बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या जेडीयूसोबत भाजपाचे खटके उडत होते. दोन्ही पक्षांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून मतभेद तीव्र होत गेले. अखेर तेच निमित्त करून नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली.  मात्र जाणकारांच्या मते नितीन कुमार यांनी एका व्यापक रणनीतीनुसार भाजपाची साथ सोडली आहे. त्याची तयारी त्यांनी आधीच केली होती. 

बिहारमधील एक ज्येष्ठ राजकीय पत्रकार कन्हैय्या भिलारी यांच्या मते ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. पंतप्रधानपद मिळवण्याची नितीश कुमार यांची महत्त्वाकांक्षा आहे, तसेच विरोधी पक्षही त्यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पाहत आहेत. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून देशभर फिरून प्रचार केला होता. तसेच नितीश कुमारही देशभर फिरून प्रचार करतील. सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. ममता बँनर्जीसुद्धा ईडीच्या तपासामुळे अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार हे विरोधी पक्षांचे तगडे उमेदवार बनू शकतात. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाBiharबिहार