शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "संजय राऊतांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी घाम गाळला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:48 IST

BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपाचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे. दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हवणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली" असा गंभीर आरोप केला आहे. 

भाजपाने यानंतर संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सर्वज्ञानी संजय राऊतांनी घाम गाळला पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी, बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी, कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"सर्वज्ञानी संजय राऊत जी सर्व देशवासियांना माहिती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी कशासाठी घाम गाळला. मोदीजींनी घाम गाळला कलम ३७० हटवण्यासाठी, राम मंदिर बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी परदेशात भारताचा लौकिक वाढविण्यासाठी…आणि सर्वज्ञानी संजय राऊतांनी घाम गाळला पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी…मराठी माणसाला लुटण्यासाठी…बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी…कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी…गैरमार्गानं आलेले २५ लाख भरण्यासाठी…"

"मोदीजी गरीबांचं कल्याण करण्याबरोबरच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळताहेत. तुमची लायकी पण नाही त्यांच्यावर बोलायची. बाकी टिका करणारे  “भौंकते रहते है और हाथी चलता है !”" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन केंद्रातील मोदी-शहांच्या नेतृत्त्वावर आणि राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे.. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील, असेही राऊत यांनी म्हटलं.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी