शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil : 'मी मोदींना प्रणाम करतो', अनिल देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 09:34 IST

Chandrakant Patil : नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh) सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले होते. त्यानंतर 13 तास चाललेल्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'मी मोदींना प्रणाम करतो' या भाषेत प्रतिक्रिया दिली. (BJP Chandrakant Patil Comment on Anil Deshmukh Arrest By Ed enforcement directorate)

चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक झाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. त्यामुळे या व्यवस्थेला आणि या व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणाऱ्या मोदींना मी प्रणाम करतो.

अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन मात्र हादरले आहे. अनिल देशमुख यांसारख्या मोठा नेत्याने समाजासोबतच द्रोह केला तर सामान्य माणसाने विश्वास तरी कोणावर ठेवायचा. या अटकेनंतर किसी को भी सहा नहीं जाएगा हा मेसेज गेला. नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडांचा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं, आश्वासित करायचं अशाच माणसाला अटक झाल्याने समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झाले आहे. याचप्रमाणे बाकीचे सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यात जातील आणि सर्वसामान्य माणूस आणखी आनंदी होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय