शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:15 IST

कोअर कमिटीत शिक्कामोर्तब, आधी दिल्लीतूनच यायच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरविण्यापासून भाजपचे अनेक निर्णय दिल्लीहून झाले, त्याचा मोठा फटका बसला ही बाब समोर आलेली असताना, आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावेत, अशी भूमिका राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक रविवारी रात्री मुंबईत झाली. केंद्रीय मंत्री आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस यांना हे अधिकार देण्यात आले. तुम्हाला निर्णय स्वातंत्र्य असेल, पण मग दमदार यशाची खात्रीही तुम्हाला द्यावी लागेल, या शब्दांत भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिल्लीहून काहीही लादले जाणार नाही, याची शाश्वती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

कोअर कमिटीत शिक्कामोर्तब

फडणवीस यांनी पक्षाचे उमदेवार महाराष्ट्रातच चार-पाच नेत्यांशी चर्चा करून ठरवावेत आणि  त्या नावांना केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी घ्यावी, अशी मोकळीक दिली आहे. महायुती जागावाटपाचा फॉर्म्युला आदी अधिकार फडणवीस यांना कोअर कमिटीने दिले आहेत, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली.

दिल्लीतूनच यायच्या सूचना

सूत्रांनी सांगितले की, लोकसभेला प्रचाराची यंत्रणा राबविण्याबाबतच्या सूचना देखील दिल्लीहूनच यायच्या. पराभवाची कारणे जेव्हा जाणून घेतली गेली, तेव्हा हे सगळे समोर आले होते. रा. स्व. संघाच्या प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रणेशी समन्वय योग्य पद्धतीने साधला गेला नाही, अशाही तक्रारी होत्या.

स्थानिक नेत्यांना डावलले...

  1. लोकसभा निवडणुकीच्या वेळी  राज्यातील नेत्यांनी काही उमेदवारांची नावे सुचविली होती, पण त्यांची दखल न घेता वरून उमेदवार देण्यात आले, त्याचा फटका बसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
  2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पण अत्यंत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही काही नावांना विरोध दर्शविला होता, पण कोणाचेही ऐकले गेले नाही आणि उमेदवार दिले गेले.
  3. तीन पक्षांमधील जागावाटप, मतदारसंघ निश्चित करणे, उमदेवार ठरविणे याबाबतही वरूनच सूचना येत होत्या, त्यामुळे जागावाटप रखडले होते. 
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा