ठाणे मनपा महापौर निवडणुकीत भाजपचाही उमेदवार
By Admin | Updated: March 2, 2017 13:55 IST2017-03-02T13:16:12+5:302017-03-02T13:55:17+5:30
भाजपादेखील ठाणे मनपा महापौर पद आणि उप महापौर पदासाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहे.

ठाणे मनपा महापौर निवडणुकीत भाजपचाही उमेदवार
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 2 - ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत आता नवा ट्विस्ट आला आहे. कारण आता भाजपादेखील महापौर पद आणि उप महापौर पदासाठीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी आशादेवी सिंग तर उपमहापौर पदासाठी मुकेश मोकाशी यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसने उप महापौर पदासाठी विक्रांत चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिका महापौर आणि उप महापौर पदासाठी शिवसेनेकडून निष्ठावंतांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेनं महापौर पदासाठी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौर पदासाठी रमाकांत मढवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी, मीनाक्षी शिंदे यांनी आरोग्य समितीचे सभापतीपदही भूषवले आहे.