भाजपाला 135 जागा सोडणे शक्यच नाही!
By Admin | Updated: September 16, 2014 03:24 IST2014-09-16T03:24:59+5:302014-09-16T03:24:59+5:30
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली.
भाजपाला 135 जागा सोडणे शक्यच नाही!
उद्धव ठाकरेंनी बजावले : शिवसेनेचे मिशन 15क्
जागावाटपाचा फॉम्र्युला अचानक कसा बदलणार?
मुंबई : भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकीत 135 जागा सोडणो कदापि शक्य होणार नाही, असे स्पष्टपणो बजावतानाच लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन 15क् राबवले तर त्यामध्ये चूक काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त उद्धव
ठाकरे गोरेगावच्या आरे कॉलनीत आले होते. ‘कुणी अरे केले म्हणून त्याला कारे करायला मी आलो नाही,’ अशी कोटी उद्धव यांनी केली. ते म्हणाले, रालोआमध्ये 29 घटकपक्ष होते. मात्र नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याकरिता जेव्हा भाजपाने मिशन 272 हाती घेऊन 3क्क् जागा लढवण्याचे ठरवले तेव्हा शिवसेनेने सहकार्य केले. आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा याकरिता आम्ही ‘मिशन 15क् जागा’ असे निश्चित केले तर त्यामध्ये चूक काय, असेही ठाकरे म्हणाले.
जागा कशा कमी करून घेणार?
प्रारंभी आपल्यालाही सर्व पर्याय
खुले असल्याचे सांगणा:या ठाकरे यांनी
आज आपल्याकडून युती तुटावी असे
पाऊल आपण उचलणार नाही, असे सांगितले खरे, पण कुठला पक्षप्रमुख आपला पक्ष संपवतो. आपणच आपल्या पक्षाच्या जागा कमी कशा करून घेणार, असा प्रतिप्रश्नही केला. (विशेष प्रतिनिधी)
मोदींवर टीका नव्हे, ते तर वास्तव..
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, तर मग तामिळनाडू, पंजाबमध्ये का चालली नाही, असा प्रश्न उद्धव यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, मी समुद्रकिनारी राहतो. मी लहानपणापासून लाटा पाहिल्या आहेत, मी खोटे कशाला बोलेन? लहानपणी बाळासाहेब मला दादर चौपाटीवर घेऊन जायचे. त्या वेळी मी लाटांत भिजलो आहे. मुंबईकर लाटा बघतो आणि पावसाळ्यात लाटांमध्ये भिजतो. राजकीय परिस्थितीमधील हेच वास्तव मांडले.
वंदनीय, परम पूजनीय, आदरणीय..
शिवसेनेबरोबर असलेली चर्चा थांबवण्याची भावना व्यक्त करणारे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही. जागावाटपाबाबत आपली चर्चा ओम माथूर व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुरू असून बाकीचे वंदनीय, पूजनीय कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही, असा टोलाही उद्धव यांनी भाजपा प्रवक्त्यांना लगावला.
नेत्यांबाबत जबाबदारीने बोला
कुठल्याही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल वेडेवाकडे बोललेले कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा सूचक इशारा देत एकमेकांच्या नेत्यांबद्दल जबाबदारीने बोलले पाहिजे, अशी अपेक्षा भाजपाच्या खजिनदार शायना एन. सी. यांनी व्यक्त केली. पक्ष प्रवक्ते माधव भांडारी यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी आपण जे काही बोललो ती कार्यकत्र्याची भावना होती. शिवाय आपण आपले मत पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले, असे भांडारी यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजपासोबत शिवसेनेची फरफटच - शरद पवारांचा टोला
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा मोदींच्या प्रभावाने निवडून आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा जे सांगेल तेच शिवसेनेला ऐकावे लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सत्तेच्या राजकारणात सहभागी होऊ नये अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच तर तुमची काय प्रतिक्रिया असेल या प्रश्नावर पवार म्हणाले, हा प्रश्न आत्याबाईंना मिशा असत्या तर.. असा आहे.