शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीतही भाजपा ‘मोठा भाऊ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:49 IST

अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाप्रमाणे राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक निकालाने मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे स्पष्ट होते.

- राजा माने मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाप्रमाणे राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक निकालाने मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे स्पष्ट होते.खान्देशात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद, तर विदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मपुरी नगर परिषदेचा या निवडणुकीत समावेश होता. जळगाव महापालिका निवडणुकीनंतर खान्देशातील ‘राजकीय बाहुबली’ आपणच असल्याची साक्ष गिरीश महाजन यांनी धुळ्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील स्वत:च्या जामनेरसह शेंदुर्णी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयाद्वारे दिली आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मपुरीतील मतदारांनी मात्र त्यांच्या पदरात अपयशाचे माप टाकले. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाने ब्रह्मपुरीत मुसंडी मारली आणि तब्बल २७ वर्षांनंतर तेथे काँग्रेस विजयी झाली. रीता उराडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि काँग्रेसनेही २० पैकी १२ जागा जिंकल्या. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील नेर (जि. यवतमाळ) नगरपरिषदेवर शिवसेनेने भगवा फडकावत गड कायम राखला. असे असले तरी सेनेच्या जागा दोनने कमी झाल्या आहेत. सेनेने १८पैकी 9 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळविला. याठिकाणी काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून आधीच्या एकवरून चार जागांवर मुसंडी मारली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकली.२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिले गेले. या रंगीत तालमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडे मतदारांनी ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे निवडणूक निकाल स्पष्ट करतात. या भागात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही निकालाचे प्रतिबिंब उमटेल.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक