शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप परत ॲक्शन मोडमध्ये, १२ जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशन, शाह, नड्डा राहणार उपस्थित

By योगेश पांडे | Updated: December 21, 2024 22:28 IST

BJP News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

- योगेश पांडे  नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद या महाअधिवेशनातून करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शनिवारपासून भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाली. विधानसभा निवडणूकीअगोदर पुण्यातील बालेवाडी स्टेडियममधून विधानसभेचे रणशिंग फुंकण्यात आले होते. आता शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा शंखनाद होईल. या महाअधिवेशनाला १५ हजारांहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. तालुका महामंत्रीदेखील या महाअधिवेशनाला बोलविण्यात येतील. या महाअधिवेशनाच्या निमित्ताने शिर्डीतच पक्षाची प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. भाजपकडून १५ दिवस संघटन पर्व आयोजित करण्यात आले असून सदस्य नोंदणीवर भर देण्यात येईल. खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले टार्गेट पूर्ण झाले की नाही याचा आढावा घेण्याची जबाबदारी माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देण्यात आली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा