शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra Politics: “जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या १०० पिढ्या बरबाद होतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 22:24 IST

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनो सावधान राहा, असा इशाराही भाजप नेत्याने दिला आहे.

Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता भाजपच्याच एका नेत्याने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या १०० पिढ्या बरबाद होतील, या शब्दांत घडामोडींवर नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. तर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकाराविरोधात विरोधक जोरदार हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला होता. आता भाजप नेते बबनराव लोणीकर यांनीही याबाबत खंत व्यक्त करत पक्षातील नेत्यांना आवाहन केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगभर गौरव केला जातो 

छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार आदर्शच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ देशात नाही, तर जगभर गौरव केला जातो. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्यासारखा रयतेचा राजे होणे नाही, असे लोणीकर यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जगामध्ये आदराने घेतले जाते. त्यामुळे राजकीय पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलू नका, असे आवाहन लोणीकर यांनी केले आहे. 

दरम्यान, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापराल तर विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत आहे. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे, असे म्हणत लोणीकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनो सावधान राहा. महाराज आमचे आदर्श राजे आहेत, असे लोणीकर यांनी नमूद केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपा