शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Maharashtra Politics: “आजीने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता, देशाची माहिती नाही, पण राहुलजींची मात्र नक्की हटली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 22:48 IST

राहुल गांधींनी ४१ हजारांचा टी-शर्ट घातल्याच्या दाव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

Maharashtra Politics: आताच्या घडीला संपूर्ण देशभरात विविध कारणांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जाणाऱ्या भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. १५० दिवसांच्या या भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली असून, भाजपही याला प्रत्युत्तर देत आहे. यातच राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही यात उडी घेत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांच्या एका पत्रकार परिषदेनंतर भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या टीशर्टवरून निशाणा साधला. भाजपने ब्रँडसोबत राहुल गांधी यांचा त्या टीशर्टमधील फोटो आणि टीशर्टचा फोटो शेअर केलाय. या टीशर्टची किंमत ४१,२५७ रूपये असल्याचा आरोप भाजपने केलाय. यावर भाजपने जोरदार घणाघात ‘भारत देखो’ असे म्हटलेय. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 

देशाची नाही, पण राहुलजींची गरिबी नक्की हटली

अतुल भातखळकर यांनीही ट्विटरवर एक फोटो शेअर करत, १९७१ साली राहुलजींच्या आजीने "गरिबी हटाव" चा नारा दिला होता. देशाची गरीबी हटली की नाही माहित नाही पण राहुलजींची मात्र नक्की हटली, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. यानंतर काँग्रेसने पलटवार केला आहे. भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना पाहून घाबरलात का? मुद्द्याचे बोला. बेरोजगारी आणि महागाईवर बोला. कपड्यांची चर्चा करायची असेल तर मोदींच्या १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल. सांगा यावर बोलायचे आहे का?, असा इशारा काँग्रेसने दिला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट आणि चष्माही पाहिला आहे. भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये भीती निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. 

टॅग्स :Atul Bhatkhalkarअतुल भातखळकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा