शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "लबाड लांडगा ढोंग करतोय"; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:52 IST

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "लबाड लांडगा ढोंग करतोय" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "त्या काळात "ते" डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते, कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते" असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

"महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाहीच... तरीही लक्षात असू द्या...◆ त्या काळात "ते" डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते◆कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते◆मुंबईत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाणी तुंबत नव्हतेआणि हो.. सगळ्यात महत्त्वाचे जे काल व्हाईट पेपरवर उघड झाले, जे आम्ही सांगत होतोच..◆वेदांता आणि फॉक्सकॉन सोबत कोणताही करार झालाच नव्हता...हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तरीही "ते” ‘ प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’असे गळे काढत होते. म्हणून यांचे एका वाक्यात वर्णन एवढेच!●●लबाड लांडगा ढोंग करतोय!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आशिष शेलार यांनी याआधी उद्धव ठाकरेंवर मुलाखतीवरून निशाणा साधला होता. "घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षा चला तर मग... सोडा अहंकार... व्हा दिलदार... टोमणे मारणे सोडा.. चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं म्हणत थेट आव्हान दिलं होतं. "मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?" असा सवाल देखील विचारला होता. 

"◆मुंबईला काय घातक आहे?◆मुंबई महापालिका निवडणुका कोण कोर्टात गेल्यामुळे रखडल्यात?◆ मुंबईला कुणी किती वर्षे लुटली? ◆ मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं?◆क्रिकेटचं महत्त्व मुंबईतून खरंच संपतंय का?◆सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का ?मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागणार!घरबसल्या मुलाखत देण्यापेक्षाचला तर मग...सोडा अहंकार... व्हा दिलदार...टोमणे मारणे सोडा..चाहे तों शामियाना लगाने का हमं करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.   

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या